
लव्ह जिहादची शिकार… नॅशनल शूटर तारा शाहदेव
बहुदा देशात पहिल्यांदाच लव्ह जिहाद केसमध्ये शिक्षा सुनावण्यात आली आहे.CBI कोर्टाने नॅशनल शूटर तारा शाहदेवच्या जबरदस्ती धर्म परिवर्तन (Conversion) प्रकरणात दोषी रकीबुल ऊर्फ रंजीत कोहलीला जन्मठेप सुनावलीय. त्याचवेळी रकीबुलची अम्मी कौसर रानीला १० वर्षाची शिक्षा सुनावली आहे. हे विकृत कारस्थान रचणारा आरोपी मुस्ताक अहमदला १५ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
नॅशनल शूटर तारा शाहदेव झारखंड येथील रांचीची राहणारी आहे. तिने २०१४ साली मुस्लिम व्यक्ती रकीबुल ऊर्फ रंजीत सिंह कोहली बरोबर लग्न केलं होतं. लग्नानंतर कोहलीने ताराला धमकी दिली. तिचा मानसिक,शारीरिक छळ केला. धर्म परिवर्तनासाठी तिच्यावर मोठ्याप्रमाणावर जबरदस्ती करण्यात आली.
ताराने धीराने,हिम्मतीने २०१५ साली झारखंड हायकोर्टात रकीबुल विरुद्ध याचिका दाखल केली. तिने रकीबुल आणि त्याच्या कुटुंबावर जबरदस्ती धर्म परिवर्तन तसेच हुंड्यासाठी अनन्वित छळ केल्याची तक्रार दाखल केली. हायकोर्टाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला. सीबीआयच्या तपासातून निष्पन्न झाले की,लग्नाआधी कोहलीने तारापासून आपला मुस्लिम धर्म लपवला होता. लग्नानंतर त्याने ताराला धमकावलं,तिचा मानसिक तसेच शारीरिक छळ केला व तिला जबरदस्ती धर्म परिवर्तनासाठी भाग पाडलं. सीबीआयने कोहली, त्याची आई कौशल रानी आणि झारखंड हायकोर्टाचे माजी रजिस्ट्रार मुश्ताक अहमद यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले.
‘मी हिंदू नाही हे बोलायला भाग पाडलं’
रकीबुलने एक महिना ताराला बंधक बनवून ठेवलं. तिला जबरदस्तीने इस्लाम स्वीकारायला भाग पाडलं. तिच नाव बदलून सारा ठेवलं. ताराने तिच नाव बदलण्याला विरोध केला. रकीबुल तिला कोणाला भेटू देत नव्हता.इस्लाम धर्म स्वीकारला नाही, तर गोळी मारण्याची धमकी दिली.परंतु रकीबुल हे विसरला कि , माश्याला पाण्याची आणि नॅशनल शूटरला गोळीची कधीच भीती वाटत नाही.
ताराने केस दाखल करताना पोलिसांना सांगितलं की, त्यावेळी तीनवेळा मला ‘कुबूल है’ बोलण्यासाठी भाग पाडलं. मी धर्म बदलला, त्यामुळे मी हिंदू नाही हे बोलायला भाग पाडलं.
‘लग्नाच्या पहिल्या रात्री २०-२५ हाजींना बोलावलं’
ताराची शूटिंग ग्राऊंडवर रंजीत बरोबर ओळख झाली होती. तिथे रंजीत रोज तिची प्रॅक्टिस बघण्यासाठी यायचा. हळू-हळू दोघे बाहेर भेटू लागले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी ७ जुलै २०१४ रोजी लग्न केलं. आपण मुस्लिम आहोत, ते रंजीतने तारापासून लपवून ठेवलं. त्याने आपली खोटी ओळख सांगितली. लग्नाच्या पहिल्या रात्री २०-२५ हाजींना बोलावलं व जबरदस्तीने इस्लाम स्वीकारायला भाग पाडलं.
लव्ह जिहाद (love jihad ) म्हणजे काय ?
लव्ह जिहाद दोन शब्दांपासून तयार झाला आहे . इंग्रजी शब्द लव्ह म्हणजे प्रेम, प्यार, मोहब्बत आणि अरबी भाषेतील इस्लामी मुलतत्व जिहाद.
केरळ न्यायालयामध्ये २००८/०९ साली सर्वप्रथम “लव्ह जिहाद” या शब्दावर शिक्कामोर्तब झाले . सुप्रीम कोर्टानेही लव्ह जिहाद होतो हे मान्य केले. केरळमधील हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या माध्यमातून मुस्लिम तरुण फसवून पळवून नेत होते. आणि अक्षरशः या मुलींना पुढे नरकयातनाच भोगाव्या लागल्या आहेत. अनेक मुलींना तर वेश्यावृत्तिसाठी भाग पाडले गेले , मुलं निर्माण करण्याची मशीन (अर्थात मुस्लिम निर्माण करण्याची मशीन म्हणता येईल) म्हणूनच त्यांचा वापर केला जातोय .अरब देशांमध्ये त्यांना नेऊन सोडले जाते, तिथे त्यांचा ब्रेन वॉश करुन त्यांना जिहादी अतिरेकी बनवून सिरियासारख्या देशांमध्ये मानवी बॉम्ब म्हणून पाठवले जाते. तसेच यातील काही तरुणींना आयसीस, अल कायदा ,लष्कर ए तैयबा अशा संघटनांच्या अतिरेक्यांच्या भोगासाठी वापरले जाते . या तरुणींना अशाप्रकारे फसगतीमुळे नरकयातना भोगाव्या लागतात.

नुकत्याच यौवनात पदार्पण करणाऱ्या अल्लड मुली, शिक्षणासाठी बाहेरगावी राहणाऱ्या कॉलेज विद्यार्थिनी, असहाय्य, एकट्या राहणाऱ्या , घटस्फोटीता , परितक्त्या , विधवा , आर्थिक दृष्ट्या कमजोर निराधार महिला या सॉफ्ट टार्गेट असतात.
अल्लड वयातील मुलींना यांची जाणीव करून देणे गरजेचे आहे. त्याकरिता त्यांना लव्ह जिहादची पुर्ण ओळख करुन देऊन सावध करणे , हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. त्यासाठी सातत्याने कार्यरत रहावे लागेल.प्रेमाला विरोध असण्याचे कारणच नाही, पण जर फसवणूक करुन कोणी असं कृत्य करत असेल , तर त्याला वेळीच रोखणे आवश्यक आहे.
धीरोदात्तपणे धर्मांध,जिहादाविरुद्ध उभे राहून क्रूरकर्मा रकीबुलला जन्मठेपेपर्यंत पोहचवणाऱ्या तारा शाहदेवचे मनापासून अभिनंदन ..
हा कोर्टाचा निर्णय म्हणजे लव्ह जिहाद अस्तित्वातच नाही ही, हिंदू संघटनांच्या सुपीक डोक्यातील परिकल्पना आहे असे अकलेचे तारे तोडणाऱ्या, पुरोगामी, लिब्रान्डु , तुकडे -तुकडे गँगला न्यायालयाने लागवलेली सणसणीत चपराक आहे.
शेवटी इतकंच म्हणू इच्छितो की ,
नास्ति मातृसमा छाया नास्ति मातृसमा गतिः।
नास्ति मातृसमं त्राणं नास्ति मातृसमा प्रपा॥