“संस्कार भारती परिचय सादरीकरण” हा संस्कार भारती कोकण प्रांताचा कार्यक्रम १५ ऑक्टोबर रोजी मीनाताई ठाकरे शिल्प ग्राममध्ये उत्साहात,जल्लोषात पार पडला.
मा. मंगल प्रभात लोढाजींच्या पुढाकाराने आणि महानगर पालिकेच्या प्राची जांभेकर मॅडम, श्री भास्कर जाधव साहेब, श्री सुनील पवार साहेब तसेच महापालिका अधिकारी व कर्मचारी वर्गाने खूप मोलाचे सहकार्य याप्रसंगी केले. देशभक्तीपर गीते, पोवाडे, नाट्य अभिवाचन, एकपात्री प्रयोग, गोंधळ नृत्य, गजा नृत्य (धनगर नृत्य), बतावणी, भारूड आणि विनोदी नाट्य छटा असा बहुरंगी कार्यक्रम सादर करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात संस्कार भारतीच्या (sanskar bharti) ध्येय गीताने झाली.विशेष म्हणजे नुकतेच चारकोप, कांदिवली येथून संस्कार भारती ला जोडले गेलेले श्री संजय पंडित यांनी ध्येय गीताचा मराठी अनुवाद मूळ चालीला,आशयाला धक्का न लावता, तयार केला आहे. तो सर्व कलाकारांनी संपूर्ण वंदे मातरम् पूर्वी रंगमंचावर येऊन सादर केले.
अत्यंत कमी तयारीत ही “संस्कार भारती परिचय” हा विषय समाज, मा. मंत्री महोदय श्री मंगल प्रभात लोढा आणि महापालिका अधिकारी यांच्या समोर अत्यंत उत्तमरित्या साजरा झाला. मुख्य प्रवेशद्वाराजवळ, अगदी मान्यवर येताना आपण केलेले रांगोळी प्रात्यक्षिक आणि संस्कार भारती शी जोडलेल्या ८ चित्रकारांनी विविध ठिकाणी काढलेली केलेली चित्रे आकर्षणाचे केंद्र ठरले.
कोकण आणि गोवा प्रांत संघटन मंत्री श्री उदय शेवडे, प्रांत कार्यकारिणी सदस्य श्री संजय गोडसे, प्रांत कोषप्रमुख श्री रविंद्र फडणीस, मुंबई महानगर सह विभाग प्रमुख वीणा सामंत आणि शर्मिला भागवत, चित्रपट विधा संयोजक श्री जगदीश निषाद, सह संयोजक दीपक कदम, ज्येष्ठ कार्यकर्ते श्री अरविंद जोशी, उत्तर मुंबई चे अध्यक्ष डॉ. शशांक इनामदार, सिंधुदुर्ग महामंत्री अनिता चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकर्ते डॉ. उदय भट, उत्तर मुंबई कार्यकर्ता डॉ. स्मिता दातार आणि कोकण मंत्री सुरेन्द्र (श्रीहरी) कुळकर्णी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन उत्तर मुंबई समितीचे श्री पराग वाळिंबे यांनी केले.