श्रीराम मंदिर लोकार्पणाच्या अक्षता कलशांचे मुंबईत आगमन हजारो भक्तांच्या उपस्थितीत स्वागत..
shri ram mandir ayodhya

अयोध्येतील मंदिराचे लोकार्पण 22 जानेवारी 2024 रोजी माननीय पंतप्रधानांच्या उपस्थितीत होत आहे.
प्रत्येक हिंदू घरी अक्षता देऊन या भव्य सोहळ्याचे आमंत्रण दिले जाणार आहे.अलीकडेच अयोध्येच्या जन्मभूमी मंदिरात साधुसंतांच्या उपस्थितीत मंत्रघोषाच्या साक्षीने मंत्रीत झालेल्या अक्षता कलशांचे आगमन पुष्पक एक्सप्रेसने नुकतेच मुंबईत झाले.
विश्व हिंदू परिषदेचे कोकण प्रांतमंत्री आणि या अभियानाचे प्रमुख मोहन सालेकर यांनी हजारो राम भक्तांच्या उपस्थितीत अक्षता कलशांचा स्वीकार केला. तदनंतर अक्षता कलशाची दादर पूर्व हनुमान मंदिरापासून भव्य शोभायात्रा निघाली.“जय श्रीराम” “ सियावर रामचंद्र की जय” “श्रीराम जय राम जय जय राम” च्या प्रचंड जयघोषात निघालेली यात्रा सायन कोळीवाडा येथील हनुमान मंदिरात संपली. उपस्थित भक्तांसमोर बोलताना मोहन सालेकर म्हणाले की,”प्रत्येक श्रीराम भक्ताच्या घरी जाऊन पूजलेल्या अक्षता,प्रभू श्रीरामांचे छायाचित्र आणि जवळच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याची योजना आहे.

कोकण प्रांतातील 20 लाख घरी एक जानेवारी ते 15 जानेवारी 2024 पर्यंत संपर्क करण्यात येईल आणि 22 जानेवारी 2024 रोजी रामभक्तांनी आपल्या राहत्या ठिकाणच्या मंदिरात दुपारी 11 ते 1 या काळात भजन,कीर्तन,नामजप करून आनंद उत्सव साजरा करावा असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी कोकण प्रांत बजरंग दल सहसंयोजक रणजीत जाधव,विभाग मंत्री राजेंद्र चौबे, प्रांत संमरसता प्रमुख नरेश पाटील,प्रांत सहमंत्री अनिरुद्ध भावे आदींची विशेष उपस्थिती होती शेवटी सामुदायिक आरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली आणि अक्षता कलश हनुमान मंदिरात पूजनासाठी ठेवण्यात आले.

जारीकर्ता-
श्रीराज नायर नरेन्द मुजुमदार
केद्रीय प्रवक्ता तथा कोंकण प्रांत सहमंत्री प्रचार प्रमुख कोंकण प्रांत
विश्व हिंदू परिषद विश्व हिंदू परिषद
Mob – 98209 67185 Mob – 8369204985
Email – snshriraj8@gmail.com Email- narendra.mujundar9@gmail.com