NewsWorld

कुणी इंजिन देता का..इंजिन..

Mi-35

कुठे थांबावे हे जर कळले नाही तर त्याचा “रशिया” होतो..

आपणास जरूर वाटले असेल की आज रशिया कुठून आठवला कारण कोणे एकेकाळी जवळपास अर्ध्या जगावर आपले अधिराज्य गाजवणाऱ्या रशियाला आता स्वतः विकलेले हेलिकॉप्टर इंजिन आता परत मागावे लागतेय काय म्हणावे या दुर्दशेला…

रशिया-युक्रेनच्या युद्धाला आता जवळपास ६२६ दिवस होत आले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जग व्याकुळ, निराश, हतबल झाले आहे. हे कमी वाटावे की काय म्हणून हमासने इस्राईलवर आक्रमण करून नृशंस हिंसाचार माजवल्याने russia ukraine war हा विषय फार मागे पडला आहे,संपूर्ण जगाचे लक्ष गाझापट्टीमध्ये अडकले आहे.

समय बड़ा बलवान..

रशियाने इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला हेलिकॉप्टर इंजिन परत करण्यास सांगितले. Mi-35M हेलिकॉप्टर रशियन सैन्यासाठी अतिशय आवश्यक आहेत. प्रदीर्घ सुरु असलेल्या संघर्षामुळे रशियन डिफेन्स कॉरिडॉर आता अडचणीत आला आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलनुसार (The Wall Street Journal), रशियाने इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला Mi-35M हेलिकॉप्टरचे इंजिन परत करण्यास सांगितले आहे. इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने मात्र as usual हे वृत्त फेटाळून लावले आणि आपल्या निवेदनात म्हटले आहे की रशियाने अशी कोणतीही विनंती केली नाही.

युक्रेनसोबत दीर्घकाळ युद्ध सुरू असताना रशियाने ही मागणी केली आहे. त्यामुळे लष्करी संसाधनांची गरज भागवण्याचे आव्हान रशिया समोर आहे. अशा परिस्थितीत मॉस्कोने युक्रेनच्या संघर्षात मोठ्या प्रमाणावर वापरल्या गेलेल्या Mi-35M हेलिकॉप्टरचे इंजिन परत करण्यासाठी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानशी संपर्क साधला आहे. डबघाईला आलेली आर्थिक स्थिती आणि संदोपसुंदी राजकीय परिस्थिती असलेल्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानसाठी रशियाच्या या मागण्या कठीण होऊ शकतात. अशा परिस्थितीत इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर या मागणीवर काय निर्णय घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

रशियाने केवळ इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान कडूनच नव्हे तर अनेक देशांकडून तशीच मागणी केली आहे. द वॉल स्ट्रीटने आपल्या अहवालात म्हटले आहे की, रशियाने इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान सह इतर देशांना हेलिकॉप्टर इंजिन परत करण्यास सांगणे हे स्पष्टपणे दर्शवते की, आपल्या लष्करी गरजा पूर्ण करण्यासाठी रशियाला बाहेरच्या मदतीची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे.युक्रेन युद्धाचा हवाला देत रशियाने इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान आणि इजिप्त, बेलारूससह इतर अनेक देशांना अशी विनंती केली असल्याचे अहवालात म्हटले आहे.

Mi-३५ Helicopter:-

रशियाचे Mi-35 हेलिकॉप्टर ताशी ३३५ किलोमीटर वेगाने उड्डाण करू शकते. त्याचे पहिले उड्डाण १९ सप्टेंबर १९६९ रोजी झाले. १९७२ मध्ये सोव्हिएत सैन्यात त्याचा समावेश करण्यात आला. रशियासह जगातील ६६ देशांच्या वायुसेनेत Mi-35 हेलिकॉप्टरचा समावेश आहे. यावरून या हेलिकॉप्टरच्या ताकदीचा अंदाज आपल्याला लावता येतो.

अटैक Mi-३५ हेलिकॉप्टरमध्ये पैसेंजर कंपार्टमेंट आहे. ते आठ सशस्त्र सैनिक वाहून नेऊ शकते. एवढेच नाही तर त्या जागी चार स्ट्रेचरही ठेवता येतात. या क्षमतेमुळे एमआय-३५ हेलिकॉप्टर युद्धाच्या काळातही सैनिकांची ने-आण, जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी वापरले जाते.

इतकंच नाही तर जेव्हा या हेलिकॉप्टरवरील सैनिक युद्धक्षेत्रात दोरीच्या साहाय्याने खाली उतरतात तेव्हा हे हेलिकॉप्टर त्यांना जवळून हवाई सपोर्टही देऊ शकते. याद्वारे जवानांना दारूगोळा, इंधन आणि खाद्यपदार्थांचा पुरवठाही करता येतो. Mi-35 मध्ये पैसेंजर कंपार्टमेंट असणे खरोखरच या हेलिकॉप्टरची आश्चर्यकारक आणि अद्वितीय क्षमता दर्शवते.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालाने हे स्पष्ट केले आहे की, रशिया युद्धादरम्यान तात्काळ मदत शोधत आहे. युद्धादरम्यान रशियाच्या संरक्षण उद्योग देखील प्रचंड दबावाखाली आहे.भारताने देखील रशियाला लढाऊ हेलिकॉप्टर ,विमानांची तसेच लष्करी सामग्रीची ऑर्डर दिली आहे.ही एवढी मोठी ऑर्डर रशिया या कठीण परिस्थितीत पूर्ण करू शकत नाही.भारताचे शेजारी शत्रू अणू शस्त्र संपन्न आहेत.त्यामुळे भारताला स्व-संरक्षणासाठी इतर कोणावर विसंबून राहणे अतिशय धोकादायक आहे. यावर उत्तर म्हणजे आत्मनिर्भर भारत !

आपण नेहमी म्हणतो की, “वक्त वक्त की बात है”, आज तीच वेळ रशियावर आली आहे. ज्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानकडे आपलेच इंजिन परत मागण्याची वेळ रशियावर आलीय. युद्ध सुरु करणे ,आक्रमण करणे अतिशय सोपे असते परंतु युद्ध कुठे थांबवावे हे कळणे अतिशय आवश्यक असते.

आचार्य चाणक्य म्हणतात ना :- There is some self-interest behind every friendship. There is no friendship without self-interests. This is a bitter truth.

Back to top button