
महाराष्ट्रातील पद्म पुरस्काराने सन्मानित १३ महानुभावांचा अल्प परिचय सांगणारी १३ भागांची विशेष मालिका..
पद्मभूषण
-अश्विन मेहता (वैद्यकीय),

अश्विन बालचंद मेहता हे एक हृदयरोगतज्ज्ञ असून, ते भारतातील इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजीचे प्रणेते आहेत. मुंबईतील जसलोक हॉस्पिटल येथे कार्डिओलॉजी विभागाचे संचालक आहेत आणि ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये सल्लागार म्हणून काम करतात. डॉ. अश्विन बालचंद मेहता यांना 35,000+ पेक्षा जास्त अँजिओप्लास्टी आणि 75,000+ पेक्षा जास्त अँजिओग्राफीच्या कामगिरीचे व पर्यवेक्षणाचे श्रेय देखील दिले जाते. त्यांना २००४ मध्ये पद्मश्री या नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले होते.
क्रमशः