
महाराष्ट्रातील पद्म पुरस्काराने सन्मानित १३ महानुभावांचा अल्प परिचय सांगणारी १३ भागांची विशेष मालिका..
पद्मश्री पुरस्कार..
डॉ. मनोहर कृष्णा डोळे (चिकित्सा )

डॉ. मनोहर कृष्णा डोळे हे वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी डॉ. मनोहर कृष्णा डोळे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. मनोहर डोळे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून नेत्रसेवेमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे. नेत्र तपासणी शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी विनामूल्य नेत्रसेवा देत अमूल्य योगदान दिले आहे.
पद्म पुरस्काराबाबत विचारले असता डॉ. मनोहर कृष्णा डोळे म्हणतात.. माझ्यासाठी ही एक आनंददायी बातमी आहे. आत्तापर्यंत डोळ्यांच्या एक लाख ७० हजार शस्त्रक्रिया केल्या. दृष्टिदानाचे हे काम पुढे नेण्यासाठी या पुरस्काराने बळ मिळाले आहे. वयाच्या ९६ व्या वर्षी हा सन्मान होणे ही कामाची खरी पावती आहे.
क्रमशः