News
महाराष्ट्राच्या दिंडीचे वारकरी.. पद्म पुरस्काराचे मानकरी.. भाग १०
padma-awards 2024 Maharashtra
महाराष्ट्रातील पद्म पुरस्काराने सन्मानित १३ महानुभावांचा अल्प परिचय सांगणारी १३ भागांची विशेष मालिका..
पद्मश्री पुरस्कार..
कल्पना मोरपरिया (व्यापार आणि उद्यम )
कल्पना मोरपरिया या भारतीय बँकर असून, त्यांनी 33 वर्ष आयसीआयसीआय बँकेत काम केले. सध्या त्या जेपी मॉर्गन इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. कल्पना अनेक आघाडीच्या भारतीय कंपन्यांच्या संचालक मंडळावर स्वतंत्र संचालक म्हणून काम करते. फॉर्च्यून मासिकाने आंतरराष्ट्रीय व्यवसायातील पन्नास सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक म्हणून स्थान दिले आहे.
क्रमशः