
शीर्षक वाचून आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटले असणार घटना देखील तशीच घडली आहे. उत्तरप्रदेश मध्ये राहणाऱ्या अनिस अहमदला शशी या वंचित समाजातील महिलेवर आपले नाव आकाश सांगून बलात्कार केल्याप्रकरणी आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
६ मार्च रोजी, उत्तर प्रदेशातील हापूर येथील मोहम्मद अनीस अहमद नावाच्या व्यक्तीला शशी या वंचित समाजातील हिंदू महिलेला ओळख लपवून तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला इस्लाममध्ये कन्व्हर्ट केल्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अनिसला बुलंदशहर येथील SC/ST न्यायालयाने धार्मिक धर्मांतर कायदा, SC/ST कायदा आणि IPC च्या संबंधित कलमांतर्गत दोषी ठरवले आहे. विशेष SC/ST कायदा न्यायालयाने दोषीला ४.५६ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतर बंदी कायद्यांतर्गत आजीवन कारावासाची ही पहिलीच घटना आहे.
नेमकी घटना काय ..
मोहम्मद अनीस अहमद याने हिंदू पुरुष आकाश असा मुखवटा धारण केला होता आणि मंगोलपुरी, दिल्ली येथील शशी या वंचित समाजातील महिलेशी मैत्री करून फसवले आहे. सुमारे ८ महिन्यांपूर्वी तो तिला उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील गुलाओठी भागात घेऊन गेला आणि तिच्यासोबत भाड्याच्या घरात राहू लागला. तेथे त्याने लग्नाच्या बहाण्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. त्यानंतर गुन्हेगाराने आपली खरी धार्मिक ओळख उघड केली आणि तिला जबरदस्तीने इस्लाममध्ये कन्व्हर्जन केले तसेच तिला आयशा असे नवीन नाव ठेवले.
कालांतराने अनिस तिला सोडून निघून गेला. जाण्यापूर्वी त्याने तिच्याकडील २. ५० लाख रुपये आणि सोन्याचे दागिने देखील चोरले. पीडितेने त्याच्या कृत्यामागचे कारण जाणून घेण्यासाठी त्याला फोन करण्याचा वारंवार प्रयत्न केला परंतु त्याने तिच्यावर जातीवाचक शिवीगाळ केली आणि “तू चांभार आहेस म्हणून मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही,” असा दावा केला आणि नंतर तिचा फोन नंबर देखील ब्लॉक केला.
यासंदर्भातील तक्रार २७ एप्रिल २०२२ रोजी सादर करण्यात आली. पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. हा खटला मॉनिटरिंग सेल बुलंदशहर यांनी उच्च न्यायालयात चालवला गेला ज्यामध्ये आरोपींविरुद्ध ५ साक्षीदारांची चौकशी करण्यात आली होती, राज्याच्या पोलीस महासंचालकांद्वारे चालविण्यात येत असलेल्या “ऑपरेशन कन्व्हिक्शन” या मोहिमेअंतर्गत या खटल्याला फास्टट्रॅक कोर्टात चालवले गेले.
… आणि न्याय मिळाला !

सरकारी वकिलांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे, “आरोपपत्र अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (SC/ST) न्यायालयात सादर करण्यात आले. १५ मार्च २०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. महिला SC/ST समुदायातील आहे तर गुन्हेगार मुस्लिम आहे. आरोपीने हिंदू असल्याचे भासवून महिलेची फसवणूक केली..वकिलांनी पुढे सांगितले की, “भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६(२), ४२० आणि ४०६ तसेच SC/ST कायद्याच्या ३, २ आणि ५ आणि ३/५ बेकायदेशीर धार्मिक धर्मांतर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
अनिसला वरील सर्व आरोपांखाली दोषी ठरवण्यात आले आणि त्याला आजीवन कारावासासह ४.५६ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. त्यातील ३.५० लाख रुपये पीडितेला दिले जावेत असा आदेश कोर्टाने दिला आहे. अशा स्वरूपाची ही पहिलीच घटना आहे जिथे एखाद्या दोषीला धर्मांतरासाठी शिक्षा झाली आहे.”
बुलंदशहरच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षकांनी माहिती दिली की, पोलिसांनी एका महिन्यात आरोपपत्र दाखल करून वेगाने तपास केला. पोलिसांनी नियोजित तारखेला साक्षीदारांना न्यायालयात हजर केले. पीडितेची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरचे स्टेटमेंट व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्राप्त करण्यात आले कारण पीडिता तिच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी बेंगळुरूला असल्याने शारीरिकरित्या कोर्टात हजर राहू शकत नव्हत्या. ते पुढे म्हणाले की, बेकायदेशीर धार्मिक धर्मांतरण अध्यादेश, २०२० ह्या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
लव्ह जिहाद (love jihad ) म्हणजे काय ?

लव्ह जिहाद दोन शब्दांपासून तयार झाला आहे . इंग्रजी शब्द लव्ह म्हणजे प्रेम, प्यार, मोहब्बत आणि अरबी भाषेतील इस्लामी मुलतत्व जिहाद.
केरळ न्यायालयामध्ये २००८/०९ साली सर्वप्रथम “लव्ह जिहाद” या शब्दावर शिक्कामोर्तब झाले . सुप्रीम कोर्टानेही लव्ह जिहाद होतो हे मान्य केले. केरळमधील हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या माध्यमातून मुस्लिम तरुण फसवून पळवून नेत होते. आणि अक्षरशः या मुलींना पुढे नरकयातनाच भोगाव्या लागल्या आहेत. अनेक मुलींना तर वेश्यावृत्तिसाठी भाग पाडले गेले , मुलं निर्माण करण्याची मशीन (अर्थात मुस्लिम निर्माण करण्याची मशीन म्हणता येईल) म्हणूनच त्यांचा वापर केला जातोय .अरब देशांमध्ये त्यांना नेऊन सोडले जाते, तिथे त्यांचा ब्रेन वॉश करुन त्यांना जिहादी अतिरेकी बनवून सिरियासारख्या देशांमध्ये मानवी बॉम्ब म्हणून पाठवले जाते. तसेच यातील काही तरुणींना आयसीस, अल कायदा ,लष्कर ए तैयबा अशा संघटनांच्या अतिरेक्यांच्या भोगासाठी वापरले जाते . या तरुणींना अशाप्रकारे फसगतीमुळे नरकयातना भोगाव्या लागतात.
नुकत्याच यौवनात पदार्पण करणाऱ्या अल्लड मुली, शिक्षणासाठी बाहेरगावी राहणाऱ्या कॉलेज विद्यार्थिनी, असहाय्य, एकट्या राहणाऱ्या , घटस्फोटीता , परितक्त्या , विधवा , आर्थिक दृष्ट्या कमजोर निराधार महिला या सॉफ्ट टार्गेट असतात.
अल्लड वयातील मुलींना यांची जाणीव करून देणे गरजेचे आहे. त्याकरिता त्यांना लव्ह जिहादची पुर्ण ओळख करुन देऊन सावध करणे , हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. त्यासाठी सातत्याने कार्यरत रहावे लागेल.प्रेमाला विरोध असण्याचे कारणच नाही, पण जर फसवणूक करुन कोणी असं कृत्य करत असेल , तर त्याला वेळीच रोखणे आवश्यक आहे.
धीरोदात्तपणे धर्मांध,जिहादाविरुद्ध उभे राहून क्रूरकर्मा अनिसला जन्मठेपेपर्यंत पोहचवणाऱ्या शशीचे मनापासून अभिनंदन ..
हा कोर्टाचा निर्णय म्हणजे लव्ह जिहाद अस्तित्वातच नाही ही, हिंदू संघटनांच्या सुपीक डोक्यातील परिकल्पना आहे असे अकलेचे तारे तोडणाऱ्या, पुरोगामी, लिब्रान्डु , तुकडे -तुकडे गँगला न्यायालयाने लागवलेली सणसणीत चपराक आहे.
शेवटी इतकंच म्हणू इच्छितो की ,
कधी शारदा तू कधी लक्ष्मी तू, कधी भाविनी वा कधी रागिणी,
सहस्रावधी सूर्य झुकतात जेथे स्वयंभू अशी दिव्य सौदामिनी…