संत कबीरांचे इस्लाम विषयक विचार मांडणारी ३ भागांची विशेष मालिका..
स्वामी रामानंद आणि कबीर…
त्याकाळात स्वामी रामानंद हे काशी क्षेत्रातील महान सत्पुरुष होते. त्यांच्याकडे अनेक जाती धर्मातील लोक जात येत असत. ते सर्वांना वेद, उपनिषिदे, शास्त्रे प्राणे यांच्या आधारे मार्गदर्शन करीन. त्यांनी ही अनेक रचनांची निर्मिती करून ठेवलेली आहे. त्यांच्या अनेक रचनांचा समावेश ‘गुरुग्रंथ साहेबा’ या ग्रंथात केला गेलेला आहे. कबीरांचे देखील स्वामी रामानंदाकडे जाणे येणे घडत असे. स्वामी रामानंदाच्याकडूनच गंगाघाटावर कबीरांना रामनामाची दीक्षा मिळाली असे मानले जाते. आपल्या साख्यात गुरु महिमा गातांना कबीर म्हणतात.
‘तीन लोक नौखंडमे गुरुते बडा कोड़।
करता करै न करि सकै गुरुते बडा न कोह।’
संत कबीरांचा संघर्ष..
संत कबीरांच्या चरित्रात प्रारंभीच्या कालखंडात त्यांना मुल्ला, मौलवी यांच्याबरोबर संघर्ष करावा लागलेला होता असे दिसते. हा संघर्ष मात्र वैचारिक असा होता. या संघर्षाच्या निमित्ताने कबीरांचे चरित्र मात्र अद्भुत रम्यतेने व्यापलेले दिसते.
कबीर मुसलमान समाजातील असून ही रामाचे नाव घेतात. हिंदूच्या देव-देवतांची पूजा अर्चा करतात. मुसलमान समाजातील अनिष्ठ रुढी, पूजा परंपरा, अत्याचार या गोष्टीच्यावर कडाडून हल्ला चढवितात म्हणून मुसलमान समाजातील मुल्ला, मौलवी, अमीर उमराव यांनी त्यांना विरोध केला.
कबीरांच्या विरोधकांनी बादशहा सिकंदर लोदी याच्याकडे खोट्या तक्रारी करुन बादशहाचे कबीरा विषयीचे मत कलुषित केले. बादशहाने कबीरांना गंगा नदीत बुडविण्याची, हत्तीच्या पायाखाली तुडवुन मारण्याची शिक्षा दिली पण या सर्वांतून कबीर सुखरुप बाहेर पडले, बादशहाचे कवीरांचे सामर्थ्य ओळखले. बादशहा कबीरांना शरण गेला, सर्वत्र कबीरांचा लौकीक वाढला कबीर एका दोहयात लिहितात-
‘कबीर ना हमा किआ न करहिगे, ना करि सके सरीरु।
किआ आनऊ किछु हरि कोआ, भइओ कबीरु कबीरु ।।’
अर्थः- ‘मी काहीही केले नाही. काही करु ही शकणार नाही. जे काही केले. जे काही घडले. ते त्या प्रभु परमात्म्यानेच केले. पण लोकात मात्र कबीराचे नाव झाले.
कबीरांनी कायमच हिंदूंवरच ताशेरे ओढले असेच आपल्याला भासवले जाते. मुद्दाम त्यांचे विचार दाखले म्हणून आपल्याला दिले जातात त्यांनी मुसलमानांवर देखील आपले विचार वेळोवेळी प्रकट केले आहेत. ते मात्र आपल्याला कधीच सांगितले जात नाही. म्हणूनच कबीरांच्या इस्लाम विषयक निवडक पंक्ती पुढीलप्रमाणे..
कबीर दास यांनी स्पष्टपणे इस्लामिक सुन्नत, रोजा, नमाज, कलमा, काबा, बांग आणि ईदच्या दिवशी बलिदानाचे खंडन केले. कबीर साहिब यांचे इस्लामशी संबंधित विचार प्रसिद्ध शीख धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिब येथे स्पष्टपणे मांडले आहे.
1. सुन्नत चे खंडन..
काजी तै कवन कतेब बखानी ॥
पदत गुनत ऐसे सभ मारे किनहूं खबरि न जानी ॥१॥ रहाउ ॥
सकति सनेहु करि सुंनति करीऐ मै न बदउगा भाई ॥
जउ रे खुदाइ मोहि तुरकु करैगा आपन ही कटि जाई ॥२॥
सुंनति कीए तुरकु जे होइगा अउरत का किआ करीऐ ॥
अरध सरीरी नारि न छोडै ता ते हिंदू ही रहीऐ ॥३॥
छाडि कतेब रामु भजु बउरे जुलम करत है भारी ॥
कबीरै पकरी टेक राम की तुरक रहे पचिहारी ॥४॥८॥
सन्दर्भ- राग आसा कबीर पृष्ठ 477
म्हणजे कबीरजी म्हणतात, हे काजी, ते कोणत्या ग्रंथाचे वर्णन करत आहेत? भटकत असताना नकळत सगळेच मारले गेले. जो कोणी धर्माच्या प्रेमात जबरदस्तीने माझी सुन्नत करेल पण मी करवून घेणार नाही. जर देवाने फक्त सुन्नत करून एखाद्याला मुस्लिम बनवले तर लिंग आपोआप कापले जाणार नाही. सुन्नत पाळूनच जर कोणी मुस्लीम झाला तर त्या स्त्रीचे काय करणार? म्हणजे काहीच नाही ,म्हणून हिंदू राहणे चांगले.हे काझी! कुराण सोडा! तुम्ही रामभक्तांवर प्रचंड अत्याचार करत आहात, मी रामाचा आधार घेतला आहे, सर्व मुस्लिम हरल्यावर पश्चाताप करत आहेत.
2. रोजा, नमाज़, कलमा, काबा चे खंडन
रोजा धरै निवाज गुजारै कलमा भिसति न होई ॥
सतरि काबा घट ही भीतरि जे करि जानै कोई ॥२॥
सन्दर्भ- राग आसा कबीर पृष्ठ 480
अर्थात मुसलमान रोजा ठेवतात आणि नमाज़ पढतात कलमा पढतात कबीरजी म्हणतात की याने कोणालाच फायदा होणार नाही. नीट विचार केल्यास या शरीरात ७० काबा आहेत.
क्रमशः