CultureHinduismNewsSpecial Day

कान्होजी आंग्रे… बस नाम काफी है ! – भाग २

sarkhel kanhoji angre...

सरखेल कान्होजी आंग्र्यांचा पराक्रम सांगणारी २ भागांची विशेष मालिका ..

शिवाजी महाराजांच्या देहावसाना नंतर १८ वर्षांनी आणि ताराबाईंच्या शासनकाळात कान्होजी यांच्याकडे केवळ १० जहाजे होती. त्यांनी त्या परिस्थितीत देखील आपली नौसेना विकसित केली. कोकणमधील जंगल आणि मच्छीमारांच्या कौशल्याचा वापर करून जहाजनिर्मिती केली.पोर्तुगीज, ब्रिटिश किंवा डच या देशांपैकी कोणीही त्यांच्याविरुद्ध जिंकू शकले नसते, म्हणूनच निराश युरोपियन शक्तींनी बहुतेक वेळा त्यांचा उल्लेख समुद्री डाकू म्हणून केला. भारतीय शक्तींनी समुद्रावर युरोपियन प्रभुत्व रोखण्याची ही पहिलीच वेळ होती, परंतु युयोपियनांनी मराठ्यांच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले होते आणि त्यांना योग्य धडा शिकवण्याची गरज होती.

परकियांना पुरुन उरले..

सागरी भागात मुक्तपणे संचार करणार्या परकियांवर कान्होजींनी निर्बंध आले होते. १६९८ पासून मराठी राज्याची सागरी सत्ता कान्होजींकडे एकवटली होती. त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही सागरावर व्यापार करू शकत नव्हते याचा प्रतिकार करण्याचे परकियांनी ठरवले.सर्व परकियांनी एकत्रित येऊन कान्होजींना संपविण्याचे ठरवले.तरीही त्यांनी इंग्रज, पोर्तुगीजांनाही पराभुत केले.शत्रुच्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी कान्होजींनी दुर द्रुष्टिने अगोदरच अनेकांशी मैत्रीचे संबंध ठेवले होते.अशा संबंधांच्या मदतीने त्यांनी आपले आरमार अधिक शस्त्रसज्ज केले.

पोर्तुगीजांच्या मदतीने शस्त्रनिर्मितीचा कारखाना आणि कुलाबा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग येथे सुधारीत पद्धतीने जहाज बांधनीचे कारखाने त्यांनी उभारले.या सुसज्जतेसह कान्होजींनी समुद्रकिनार्यावर एक दबदबा निर्माण केला होता. कान्होजींचा लढा पोर्तुगीजांच्या,इंग्रजांच्या धार्मिक आक्रमणाची धार कमी करण्यासाठी देखील कारणीभूत ठरला..

इ. स. १६९४ ते १७०४ च्या दरम्यान पश्चिम किनारपट्टीतील मुघलांकडे गेले मराठ्यांचे सर्व किल्ले कान्होजींनी परत घेतले, शिवाय कुलाबा जिंकून त्यास आपले प्रमुख ठाणे केले. मुंबईजवळच्या खांदेरी आणि उंदेरी या बेटांवर आपला तळ स्थापन करून कान्होजींनी मुंबई बंदराच्या प्रवेशद्वाराची नाकेबंदी केली. येणाऱ्या-जाणाऱ्या व्यापारी जहाजांकडून त्यांनी कर वसूल करायला आरंभ केला.

शिवाजी महाराजांच्या प्रादेशिक रणनीतीचा कान्होजींवर प्रभाव होता. सैनिक,तोफा,शस्त्रास्त्रे यांच्यावर हल्ले करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा स्रोत नसल्यामुळे, कान्होजींनी आपली लढाई जिंकण्यासाठी गनिमी रणनीती वापरली.४ नोव्हेंबर १७१२ रोजी कोन्होजींच्या आरमाराने मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम ऐलाबी यांचे खाजगी जहाज अल्जेरीन पकडले. त्या जहाजावरील ब्रिटिशांच्या कारवारमधील वखारीचा प्रमुख थॉमस क्राउन लढाईत मारला गेला.त्याच्या पत्नीला युद्धबंदी म्हणून पकडण्यात आले.

१३ फेब्रुवारी १७१२ मध्ये कान्होजी आणि इंग्रजांमध्ये तह होऊन ३०,००० रुपये कराच्या मोबदल्यात ते जहाज आणि स्त्री इंग्रजांना परत करण्यात आली. या तहान्वये ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांना त्रास न देण्याचे कान्होजींनी मान्य केले.या प्रकाराने विल्यम कमालीचा त्रस्त झाला आणि कंटाळून ऑक्टोबर १७१५ मध्ये आपल्या मायदेशी इंग्लंडला परत गेला.

२६ डिसेंबर १७१५ मध्ये चार्लस बून यांची मुबंईच्या गव्हर्नरपदी नेमणूक करण्यात आली. त्यांनी कान्होजींना पकडण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण त्यात ते अपयशी ठरले. उलट कान्होजींनी १७१६ मध्ये इंग्रजांची तीन जहाजे पकडली.कान्होजींनी मुबंई बंदराची पूर्ण नाकेबंदी करून ईस्ट इंडिया कंपनीकडून ८७५० पौंडाचा कर वसूल केला.१७२० मध्ये इंग्रजांनी कान्होजींच्या विजयदुर्ग किल्ल्यावर हल्ला चढविला. त्यांनी किल्ल्यावर तोफांचा मारा केला, पण हा हल्ला अयशस्वी ठरला. आणि इंग्रजांनी परत माघार घेतली.

१७२१ मध्ये पोर्तुगीज आरमाराने आणि इंग्रज आरमाराने मिळून ६००० सैनिकांसह आणि ४ मोठ्या जहाजांसह कान्होजींविरुद्ध संयुक्त मोहीम हाती घेतली. एका आरमाराच्या विरुद्ध दोन आरमार एकत्र झाले.इतके शूर सैन्य होते कान्होजींचे !! ज्यांच्या भीतीने यूरोपात एकमेकांचा द्वेष करणारे,एकमेकांना पाण्यात पाहणारे भारतात मात्र एकत्र झाले होते..

आता हिंदवी स्वराज्याच्या आरमारावर दुहेरी आक्रमण सुरु झाले. बाजीरावांना या पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्या कुटील कारस्थानाची बातमी आधीच आपल्या हेरांकडून मिळाली होती. मग काय जमिनीवर पेशव्यांची तलवार आणि समुद्रात स्वराज्याच्या आरमाराने पोर्तुगीज, इंग्रजांना अक्षरशः भाजून काढले,कपटी कारस्थानी पोर्तुगीज आणि इंग्रज जोडगोळीचा पार धुव्वा उडाला. अशा सरखेल कान्होजींना इंग्रज आणि पोर्तुगीज आरमार सुद्धा घाबरून होते. शेवटपर्यंत त्यांनी समुद्र संरक्षण करण्यात आपले आयुष्य खर्च केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्रुत्युनंतरही औरंगजेबाला मराठी मुलूख काबीज करता आला नाही.यामागे अनेक शुर सरदारांचे योगदान होते.कोकण किनाऱ्यावरील स्वराज्याचा जागता पहारा असणारे कान्होजी हेही त्यातीलच एक. दि.४ जुलै १७२९ रोजी कान्होजींनी जगाचा निरोप घेतला.

आपल्या अतुलनीय पराक्रमाने कान्होजींनी इतिहासाच्या पानावर अमिट ठसा उमटवला आहे.म्हणूनच त्यांना गौरवाने “समुद्रावरील शिवाजी” असे म्हटले जाते.

अश्या या झुंजार,लढवय्या हिंदू सरदाराला लुटारू संबोधण्याची हिम्मतच कशी होते ? पश्चिमी मानसिकता कायमच भारता विरोधात वागत आली आहे,पण त्यांनी हे डोस्क्यात घेतले पाहिजे की हा जागृत भारत “अरे ला कारे” म्हणणारा आहे. आत्ताच आपण आपल्यावर अनन्वित अत्याचार करणाऱ्या ब्रिटिशांना अर्थव्यवस्थेत मागे टाकले आहे. आणि ही तर फक्त सुरवात आहे…

समाप्त..

Back to top button