गुलामगिरी सोडून वेगाने प्रगती करणारा आनंदी, आत्माभिमानी भारत..
world happiness report 2025...

शीर्षक वाचून आज अचानक फिलॉसॉफी कस काय असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. खरेतर एवढा प्रपंच करण्याचे कारण म्हणजे नुकताच ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वेलबीइंग रिसर्च सेंटरने गॅलप, यूएन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्कने २० मार्च रोजी जागतिक आनंद अहवाल- २०२५ प्रकाशित केला. या अहवालात तुमच्या माझ्या प्राणप्रिय भारताचा ११८ वा क्रमांक आहे.
अजिबात वाईट वाटून घेऊ नका कारण २०२४ च्या तुलनेत भारताचे रँकिंग सुधारलं आहे. गेल्या वर्षी भारत हा १२६ व्या क्रमांकावर होता. इतना ही नहीं उभी और सुनीये जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीत भीकमाग्या पाकिस्तानचा क्रमांक भारतापेक्षा चांगला दाखवला आहे. ज्या देशाचे कधी तुकडे होतील हे सांगता येत नाही तो कर्मदरिद्री पाकिस्तान १०९ व्या स्थानावर आहे. ‘गजब बेइज्जती है’..
जागतिक आनंद दिनानिमित्त, जागतिक आनंद निर्देशांक २०२५ जारी झाला आहे. ज्यामध्ये फिनलंड ७.७ गुणांसह आनंदी देश म्हणून पहिल्या क्रमांकावर आहे. फिनलंडने सलग आठव्या वर्षी जागतिक आनंद अहवालात आपले पहिले स्थान कायम राखले आहे. फिनलंड व्यतिरिक्त, डेन्मार्क, आइसलँड आणि स्वीडन हे देश पहिल्या चारमध्ये कायम आहेत. १४७ देशांच्या या यादीत, भारत यावर्षी ४.३ गुणांसह ११८व्या क्रमांकावर आहे. गेल्या वेळी भारत यादीत १२६ व्या स्थानावर होता. या वर्षी भारत पाकिस्तान आणि नेपाळच्याही मागे आहे.इतकेच नव्हेतर या यादीत, युक्रेन, मोझांबिक, इराण, इराक, पाकिस्तान, पॅलेस्टाईन, काँगो, युगांडा, गांबिया आणि व्हेनेझुएला सारख्या देशांचे रँकिंग युद्ध, राजकीय आणि आर्थिक समस्यांनी वेढलेले असूनही भारतापेक्षा उत्तम आहे.
काय म्हणावे याला.. आता पर्यंत आपण ही बातमी वाचलीच असेल, माझ्यासारख तुमचं रक्त देखील खवळले असेल. राष्ट्रप्रेमी सरकारच्या अथक प्रयत्नातून गेल्या १० वर्षात भारतातील तब्बल ३० कोटी जनता गरिबीच्या दृष्टचक्रातून बाहेर पडली आहे. केवढी मोठी उपलब्धी आहे ही हे या ४०-५० लक्ष लोकसंख्या असलेल्या देशांना हे कधीच कळणार नाही.अशी शंका येते की मुद्दाम भारताला बदनाम करण्यासाठी अश्या प्रकारचे रिपोर्ट तयार केले जातात, आणि भारताची प्रतिमा मलीन करण्याचा,बिघडवण्याचा यथोचित प्रयत्न केला जातो.
१४० कोटींचा असलेला हा देश आणि त्यात फक्त १००० लोकांच्या मतावरून हा अहवाल सादर करण्याची हिम्मतच कशी होते ?
आम्ही आनंदी आहोत की नाही हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला.. षड्यंत्रकारी गोऱ्या चमडी वाल्यांना भारताची उत्तरोत्तर होणारी प्रगती पाहवली जात नाही, पाश्चिमात्य देशात भारतीयांवर होणारे भयावह रेसिस्ट हल्ले याच कपटी मानसिकतेचे प्रतीक आहे. भारत गुलामगिरीतून कधीच बाहेर पडून महाशक्ती म्हणून उदयास येत आहे.
ज्या फिनलँड देशाला पहिला क्रमांक दिला आहे त्या फिनलँड मध्ये आत्महत्या करण्याचा दर भारतापेक्षा खूप जास्त आहे. असो आता युरोपकडे वळूया..यूरोपात काय सुरु आहे आज, आपण जाणतोच ! आधी कोरोना आणि आता रशिया-युक्रेन युद्धामुळे पूर्ण यूरोप उध्वस्थ झाला आहे.सामाजिक ,आर्थिक आणि वैचारिक पातळीवर देखील युरोपची अधोगतीच सुरु आहे. कोरोनामध्ये युरोपची दयनीय अवस्था आपण ‘याची देही डोळा’ पहिली आहे,त्यासाठी जबाबदार असलेल्या चीनला बोलायची तुमच्या बापाची हिम्मत आहे का ? या उलट चीन आणि युरोपचा व्यापार १५० बिलियन डॉलर ने वाढला आहे.याच पैशाच्या जोरावर चीन रशियाला येनकेन प्रकारे मदत करतोय..

हे झाले युरोपचे आता भारताकडे येऊया, भारत कोरोनातून सावरून प्रचंड वेगाने मार्गक्रमण करत आहे. नुकतेच आपण आपल्यावर ज्यांनी अनन्वित अत्याचार केले अश्या ब्रिटनला मागे टाकून जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झालो आहोत. भारत आता वर्ल्ड फार्मसी म्हणून उदयास आला आहे. विज्ञान,डिफेन्स सेक्टर,स्टार्टअप्स,विदेश नीती, स्पेस रिसर्च या आणि अश्या प्रकारच्या अनेक क्षेत्रांमध्ये भारत घोडदौड करतोय.आता भारताला अश्या छोट्या मोठ्या NGO मुळे किंवा त्यांनी केलेल्या कागाळ्यांमुळे काहीच फरक पडत नाही. उलट हेच NGO आता उघडे पडत चालले आहे.
NGO’s newspaper ad asks Americans for donations after Trump’s drastic aid cuts..
भारताविरुद्ध षडयंत्र करणार्यांना माझे एवढेच सांगणे आहे की मलेशियाचे उदाहरण बहुदा आपण विसरला असाल , मलेशियाने UN मध्ये POK पाकिस्तानचा अविभाज्य भाग असे म्हटले होते. त्या नंतर भारताने मलेशियाचे पाम ऑइल आयात करणे सोडून दिले आहे, त्यामुळे मलेशिया मध्ये मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. जशास तसे उत्तर देण्याची ताकद असलेला हा नवा हिंदुस्थान आहे हे या छद्मी पुरोगाम्यांनी सदैव याद ठेवावे..
म्हणतात ना :- “जेव्हा जंगलातील हत्ती पळतो तेव्हा त्याच्या मार्गात येणाची हिम्मत वनराज देखील करत नाही “
तसे महद प्रयासाने भारत रुपी हत्ती आता आपली ताकद दाखवण्यास सिद्ध आहे,त्याच्या मार्गात येण्याची हिम्मत कोणीही करू नये अन्यथा त्याचा कपाळमोक्ष निश्चित..
