भिकाऱ्याला ..ओकाऱ्या..
इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे (pakistan) म्हणणे आहे की, ते या आठवड्यात अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लोकशाही शिखर परिषदेत सहभागी होणार नाहीत… सर्वकालीन मित्र असलेल्या चीनला शांत ठेवण्यासाठीच या कंगाल इस्लामिक राष्ट्राची केविलवाणी धडपड म्हणून पाहिले जात आहे…
डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, तुर्किये (turkey) आणि चीनला(china) या शिखर परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आलेले नाही. चीन या प्रस्तावांवर बारकाईने नजर ठेवणार कारण अमेरिकेने आधीच चीनचा कट्टर शत्रू असलेल्या तैवानला आमंत्रित करून बीजिंगला डिवचले आहे…
झाले आहे असे की, रिपब्लिक ऑफ पाकिस्तानने मंगळवारी जाहीर केले की, ते या आठवड्यात अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लोकशाही शिखर परिषदेत (democracy summit) सहभागी होणार नाहीत… वॉशिंग्टनमध्ये बुधवार आणि गुरुवारी होणाऱ्या शिखर परिषदेसाठी बायडन प्रशासनाने १२० जागतिक नेत्यांना आमंत्रित केले आहे… त्यात भारत अग्रक्रमाने पहिल्या १० मान्यवर देशांच्या निमंत्रितांमध्ये आहे…
इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात युनायटेड स्टेट्स (us) आणि त्याच्या सह-यजमानांचे आमंत्रण दिल्याबद्दल आभार मानले आहेत… डिसेंबर २०२१ मध्ये झालेल्या पहिल्या आणि त्या शिखर परिषदेच्या दरम्यान झालेल्या बैठकांमध्ये देखील इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान सहभागी झाला नव्हता… २२० दशलक्ष लोकसंख्येसह इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान हा जगातील ५व्या क्रमांकाचा देश आहे… टीकाकार म्हणतात की इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान जगातील सर्वात वाईट लोकशाही देशांमध्ये आहे…
माजी पंतप्रधान इम्रान खान( imran khan) यांचे सरकार आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचे प्रशासन यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान पाकिस्तानने २०२१ च्या शिखर परिषदेला हजेरी लावली नाही… वॉशिंग्टन आणि इम्रान खान यांच्यातील संबंध अधिक ताणले गेले होते तेव्हा इम्रान खान यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये मुद्दाम युक्रेनवर रशियाच्या आक्रमणादरम्यान मॉस्कोला भेट दिली होती… ३ वर्षांहून अधिक काळ पंतप्रधान म्हणून काम केलेल्या इम्रान खान यांची प्रमुख विरोधी राजकीय पक्षांच्या आघाडीने संसदेत अविश्वास ठरावात हकालपट्टी केली… तेव्हापासून इम्रान खान यांनी आरोप केला आहे की त्यांना पंतप्रधान पदावरून हटवणारे अमेरिकेच्या तालावर नाचत आहेत…
वरील विवेचनावरून आपल्याला नक्की प्रश्न पडला असेल की, अत्यंत कंगाल असलेल्या देशाने… फक्त माझ्या मित्राला, चीनला बोलावलं नाही म्हणून परिषदेत भाग घेऊ नये इतकी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची लायकी आणि हिंमत आहे ??… ही त्यांची हिंमत नाही तर आपल्या मित्रांचा म्हणजे चीन व तुर्कीयेचा गैरसमज होऊ नये… निव्वळ या एकाच कारणासाठी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान या शिखर परिषदेत सामील होणार नाहीये… कारण जर हे मित्र नाराज झाले तर नजीकच्या भविष्यकाळात इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या भिकेच्या कटोऱ्यात कोण भिक टाकेल?… Begger has no choice इतका साधा हिशोब या बहिष्कार मागे आहे…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अजूनही ९० च्या दशकात रममाण असल्यासारखे वागत आहेत… आज काळ,वेळ, परिस्थिती कमालीची बदलली आहे इतकेही भान अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाला असू नये याचीच खंत वाटते…
इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट होत चालली आहे… आपला शेजारी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे… परकीय गंगाजळीत सातत्याने घसरण होत असल्यामुळे, गेल्या वर्षी श्रीलंकेत जशी परिस्थिती उदभवली होती तसेच चित्र इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानातही दिसत आहे… उदाहरणच द्यायचे झाल्यास इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये सध्या कांद्याची किंमत २८६ रुपये आहे… इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान सरकारने उर्जेचा अपव्यय कमी करण्यासाठी मार्केट, मॉल, लग्नाचे हॉल लवकर बंद करण्याचे आदेश दिले आहेत…
वीज नाही ,गॅस नाही ,पीठ नाही ,पेट्रोल नाही पण माज मात्र भरपूर आहे…