HinduismNews

लाक्षागृहाचं महाभारत..

baghpat lakshagraha kabristan vivad case court decision in hindu side

सत्रह बार क्षमा अरिदल को ऐसी भूल ना अब होगी,.
कोटि-कोटि बाहों वाली माँ अब ना अबला कहलाएगी,
देश विघातक षडयंत्रों का निश्चित निकट विनाश,
एक अखंडित भारत देगा अनुपम विमल प्रकाश,
करवट बदल रहा है देखो भारत का इतिहास।

महाभारत काळातील ‘लाक्षागृहा’च्या भूमीवरही हिंदूंचाच अधिकार आहे, असा महत्वपूर्ण निर्णय उत्तर प्रदेशातील बागपत येथील जिल्हा न्यायालयाने दिला आहे. हे प्रकरण न्यायालयात साधारणतः ५३ वर्षे प्रलंबित होते. सोमवारी जिल्हा न्यायालयात या प्रकरणाचा निर्णय होऊन ते मार्गी लागले आहे.एडीजे न्यायालयाने (अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश) वादग्रस्त १०० बिघा (जवळपास ६२ एकर) जमीन हिंदू पक्षकारांना दिली आहे. याप्रकरणी गेल्या ५० वर्षांपासून न्यायालयात खटला चालू होता. या खटल्यात न्यायमूर्तींनी अखेर हिंदू पक्षकारांच्या बाजूने निकाल दिला आहे.

लाक्षागृह..

महाभारत काळात याच भूमीत वनवासास गेलेल्या पांडवांना जाळून मारण्याचा प्रयत्न दुर्योधनाने केला होता. यासाठी त्याने येथे ज्वालाग्रही असलेल्या लाखेपासून एक वसतीस्थान निर्माण केले होते. पांडव आपली माता कुंती हिच्यासह येथे रहावयास आल्यानंतर या लाक्षागृहाला आग लावण्याची त्यांची योजना होती. त्यानुसार पांडव तेथे वास्तव्यास गेले होते. लाक्षागृह जाळण्यातही आले होते. तथापि, सर्व पांडव कुंती आणि द्रौपदीसह सुरक्षितरित्या सुटका करुन घेण्यात यशस्वी झाले होते, असा इतिहास महाभारतात आपण वाचला आहे.

जिहादी मुस्लिमांचे अतिक्रमण..

नंतरच्या काळात धर्मांध जिहादी मुस्लिमांनी भूमीवरील हिंदूंचे मंदिर पाडून ती भूमी आपल्या ताब्यात घेतली होती. तेथे शेख बद्द्रुद्दिन यांच्या नावाने एका मझारीचे बांधकामही साधारणतः ४०० वर्षांपूर्वी करण्यात आले होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मझारीपूर्वी या स्थानी असणाऱ्या लाक्षागृह गुरुकुलाचे वंशपरंपरागत व्यवस्थापक ब्रम्हचारी कृष्णदत्त महाराज यांनी पुन्हा या भूमीत गुरुकुल स्थापन केले होते. मात्र, ही जागा वक्फ मंडळाची आहे, असा दावा करीत मुस्लीम पक्षकार न्यायालयात गेले होते.

१९७० मध्ये वक्फ बोर्डाचे पदाधिकारी असणारे बरनावा येथील मुकीम खान यांनी मेरठमधील सरधना येथील न्यायालयात एक याचिका दाखल केली. या भूखंडावर वक्फ बोर्डाचा मालकीहक्क असून ही जागा हिंदूंची नाही, या गढीच्या परिसरात सुफी संत शेख बदरुद्दीन यांची सहाशे वर्षं जुनी मजार असून या पूर्ण भूखंडावर आमची दफनभूमी आहे. तसंच हा पूर्ण भूखंड वक्फच्या मालकीचा आहे, असा दावा त्यांनी याचिकेत केला होता.

कृष्णदत्त महाराज हे बाहेरून येथे आले असून आमची दफनभूमी बळकावून येथे हिंदूंचे तीर्थस्थान निर्माण करण्याचं कारस्थान त्यांनी आखलं आहे, असा आरोपही यात करण्यात आला होता. यामध्ये ब्रह्मचारी कृष्णदत्त महाराजांना प्रतिवादी करण्यात आलं व या खटल्याचं कामकाज सुरू झाले. हा खटला प्रदीर्घ काळ चालला. यासाठी अनेक साक्षीपुराव्यांची पडताळणी करण्यात आली.

उत्खननात हिंदू धर्माची चिन्हे,प्रतीके..

सर्वांत महत्त्वाचा पुरावा ठरला तो म्हणजे भारतीय पुरातत्त्व विभागाचा अहवाल. या खटल्याच्या कितीतरी आधी, म्हणजे १९५२ मध्ये पुरातत्त्व विभागातर्फे तेथे उत्खनन सुरू करण्यात आलं. या उत्खननातून मिळालेले अवशेष पुरेसे बोलके होते. हस्तिनापूरची गादी मिळवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या दुर्योधनाने समस्त पांडवांना नष्ट करण्यासाठी लाक्षागृहाची बांधणी केली.

लाख, मेण, तेल-तूप आदी वस्तूंच्या साह्याने उभारलेल्या त्या लाक्षागृहात पांडवांना मुक्कामास थांबण्याचा आग्रह करण्यात आला. पांडव तेथे थांबलेही, परंतु विदुराद्वारे कौरवांच्या कारस्थानाची माहिती मिळाली असल्याने त्यांनी अल्पावधीत तेथे भुयार खोदून घेतलं व संधी मिळताच तेथून ते निसटले. हा सर्व इतिहास याच वास्तूत घडला अशी पारंपरिक मान्यता होती. काहींच्या मते यात काहीच तथ्य नव्हतं. परंतु पुरातत्त्व विभागाने केलेल्या उत्खननात या मान्यतांना पुष्टी मिळाली.

या उत्खननातून तेथे साडेचार हजार वर्षांपूर्वीची मातीची भांडी मिळाली. तत्कालीन विटा व अन्य साहित्यही आढळलं. हा काळ महाभारत काळाशी मिळताजुळता आहे. (पांडवांनी ज्या भुयारातून पलायन केलं ते भुयार तर आजही अर्ध्याअधिक प्रमाणात सुस्थितीत आहे.) वैदिक परंपरेशी नातं सांगणाऱ्या अन्य अनेक खुणाही उघड झाल्या. यानंतर ६ वर्षांपूर्वी म्हणजे, २०१८मध्येही तेथे उत्खनन करण्यात आलं. त्यावेळीही याच स्वरूपातील पुरावे आढळले. या दोन्ही उत्खननांत मुघलकालीन काही पुरावेही समोर आले. परंतु त्या तुलनेत महाभारताचा काळ हा कितीतरी प्राचीन असल्याने निकालाची औपचारिकताच बाकी होती.

जिल्हा आणि सत्र न्यायालयाने या सर्व साक्षीपुराव्यांचा विचार केला. उपलब्ध नोंदी, पुरातत्त्व विभागाचा अहवाल व अन्य पुराव्यांच्या आधारे हा भूखंड हिंदू पक्षकारांचा सिद्ध झाल्याने त्याची मालकी हिंदू पक्षकारांना देण्याचा निकाल न्यायालयाने दिला. तब्बल ५३ वर्षं चाललेल्या या खटल्यादरम्यान थोड्याथोडक्या नव्हे, तर ८७५ तारखा पडल्या. या कालावधीत दोन्ही मूळ पक्षकारांचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी या खटल्यात प्रतिनिधित्व केलं.

जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलेला हा निकाल जिहादी मुस्लिम पक्षकारांना मान्य नसून या निकालास ते उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत तर, हिंदू पक्षकारांनी देखील कॅव्हेट दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. या निकालानंतर लाक्षागृह परिसरात पोलिसांचा फौजफाटा दिसून येत आहे.

रामायण, महाभारत हे कपोलकल्पित कथा नसून भारत राष्ट्राचा इतिहास आहे, असे मत अनेक पुरातत्व तज्ञांनी व्यक्त केले आहे. अलिकडच्या काळातही या पुराव्यांची चर्चा अधून मधून होत असते. आता न्यायालयाच्या निर्णयामुळे या भूमीवर हिंदूंचा अधिकार प्रस्थापित झाला असून मुस्लिमांचा या जागेवरील दावा फेटाळण्यात आला आहे. काशी, मथुरासोबतच देशात लाक्षागृहाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आहे.

आज सकल हिंदू समाज हळू हळू जागा होतोय.. सतत होणाऱ्या अन्यायाची,अत्याचाराची सकल हिंदू समाजाला जाणीव होऊ लागली आहे.. प्राणप्रिय मंदिरे उध्वस्त करून बांधलेल्या मशिदी जोपर्यंत सकल हिंदू समाज परत मिळवत नाही तो पर्यंत हा लढा सुरूच राहील यात तीळ मात्र शंका नाही हे निश्चित..

शेवटी इतकंच म्हणू इच्छितो की,

हम मर्यादा पुरूषोत्तम भी, हम लीलाधर गोपाल भी हैं,
वामन अवतारी सूक्ष्म भी हम, नरसिंह जैसे विकराल भी हैं,
स्वधर्म हमारा स्वाभिमान, है गर्व हमें हम हिन्दू है।

निजधर्म की रक्षा ध्येय मगर, आक्रमण कभी न करते हैं,
हम प्रेम शान्ति के संवाहक, हम शौर्य शक्ति के सिंधु है,
स्वधर्म हमारा स्वाभिमान, है गर्व हमें हम हिन्दू है।

Back to top button