भारतीय गुणीजनांचा सन्मान…
Donald Trump taps vocal Hindu lawmakers for key cabinet roles
अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. त्याचाच भाग म्हणून ट्रम्प यांनी त्यांच्या काही सहकारी सदस्यांची नावे जाहीर केली आहे.आपल्या सरकारमध्ये ट्रम्प भारतीय वंशाच्या नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देताना दिसत आहेत.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देताना भारत आणि अमेरिकेतील संबंध दृढ करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया हॅण्डलवर (एक्स) दिवाळीच्या निमित्ताने हा मेसेज पोस्ट केला होता. ट्रम्प म्हणाले की, बांग्लादेशमध्ये हिंदू, इतर अल्पसंख्याकांवर होणाऱ्या रानटी हिंसाचाराचा मी तीव्र निषेध करतो. त्यांच्यावर जमावाकडून हल्ले होत आहेत, त्यांची लूट केली जात आहे. यामुळे अराजकता निर्माण झाली आहे. असे माझ्या कालखंडात कधीच घडले नसते. कमला आणि जो यांनी जगभरातील तसेच अमेरिकेतील हिंदूंकडे दुर्लक्ष केले. इतके करून थांबतील ते ट्रम्प कसले त्यांनी आपल्या मंत्री मंडळात देखील महत्वाच्या पदांवर स्वतःला अभिमानाने हिंदू म्हणवणाऱ्यांची नेमणूक केली आहे त्यांची नावे पुढील प्रमाणे..
उद्योजक विवेक रामास्वामी:-
ट्रम्प यांनी उद्योजक विवेक रामास्वामी यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी विवेक रामास्वामी यांच्यावर ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशिअन्सी’ या विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. शासकीय कामकाजामध्ये आणखी सुधारणा आणणे, अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी महत्त्वाची पावले उचलणे, त्यासाठी आवश्यक धोरण निश्चिती करणे, नोकरशाहीचे आकारमान कमी करणे या सर्व ध्येयधोरणांना पुढे नेण्यासाची जबाबदारी विवेक रामास्वामी आणि मस्क यांच्या खांद्यावर असणार आहे.
कश्यप (कश) पटेल:-
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश पटेल यांच्याकडे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI)चे नेतृत्व सोपवण्याची घोषणा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळादरम्यान काश पटेल अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे चीफ ऑफ स्टाफ राहिले आहेत. याशिवाय काश पटेल यांची हिंदू धर्मावर प्रचंड श्रद्धा आहे. हिंदू धर्माशी असलेला संबंधही त्यांनी त्यांच्या पुस्तकात नमूद केला आहे. त्याचबरोबर भारतातील अयोध्येत राम मंदिर उभारणीच्या वेळी त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला होता. अमेरिकेत काही संघटनांनी राम मंदिराबाबत प्रश्न उपस्थित केले होते. तेव्हा काश पटेल यांनी उघडपणे त्या संघटनांवर टीका केली होती.
तुलसी गबार्ड :-
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या सरकारमध्ये भारतीय वंशाच्या नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देताना दिसत आहेत. नुकतंच ट्रम्प यांनी राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या (नॅशनल इंटेलिजेंस) संचालकपदासाठी तुलसी गबार्ड यांची निवड करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. गबार्ड या यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये निवडून येणाऱ्या पहिल्या हिंदू होत्या. त्या आर्मी रिझर्व्हमध्ये माजी लेफ्टनंट कर्नल राहिल्या आहेत. त्यांच्या या अनुभवामुळे राष्ट्रीय गुप्तचर संचालक म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे.
जय भट्टाचार्य :-
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलकाता येथे जन्मलेल्या जय भट्टाचार्य यांची राष्ट्रीय आरोग्य संस्था (NIH)च्या संचालकपदी नियुक्ती केली आहे. ही संस्था देशातील ४७.३ अब्ज डॉलर्सचा बजेट असलेली देशातील वैद्यकीय संशोधनात प्रमुख सार्वजनिक निधी देणारी संस्था आहे. NIH ही आरोग्य आणि मानव सेवा विभाग (HHS) अंतर्गत कार्यरत असून, वैद्यकीय संशोधन आणि नवोपक्रमासाठी जबाबदार असलेली प्राथमिक यूएस सरकारी संस्था आहे.
उषा चिलुकुरी / व्हॅन्स
उषा व्हॅन्सची अमेरिकेची पहिली भारतीय वंशाची दुसरी महिला (सेकंड लेडी) होण्यासाठी सज्ज आहेत. आंध्र प्रदेशात असलेला उषा यांचा परिवार काही दशकांपुर्वी दिएगो, कॅलिफोर्निया येथे स्थायिक झाला.
भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध गेल्या 25 वर्षांमध्ये सातत्याने वाढत असून गेल्या चार वर्षांमध्ये बायडन सरकारनेही त्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. पण, डेमोकॅटिक पक्षाच्या तथाकथित पुरोगामी पाठीराख्यांमध्ये धर्मांध,जिहादी,पाकिस्तानी आणि भारतविरोधी गटांचा सहभाग ठळकपणे दिसत असल्याने हे प्रकरण षडयंत्र असल्याची भावना हिंदूंच्या मनात निर्माण झाली आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला अजून काही दिवस आहेत. बघूया पुढे काय होते ते…